पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ तुकाराम. (१७२) बीजा ऐसे फळ दावी परिपाकीपिरिमळ लौकिकी जाती ऐसा. (१७३) बोल बोलतां वाटे सोपें। करणी करितां टोर कांपे. (१७४) बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघेचि तेणें विष होय. (१७५) बाळ माते पाशी सांगे तान भूक । उपायाचं दुःखकाय जाणे. (१७६) बहु धड जरी जाली हँस गाय । तरी होइल काय कामधेनु ! (१७७) बीजा ऐसी फळे । उत्तम कां अमंगळे. (१७८) बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल. ११७९) बाळकासी चिंता काय पोटव्यथा । जया शिरीं मायबाप. (१८०) बीज तेंचि फळ येईल शेवटीं । लाभ हानि तुटी ज्याची तया (१८१) बुद्धिमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥ ____जाय तेथे अपमान । पावे हानि धुंकी जन. (१८२) बीज पेरूनियां तेंचि घ्यावें फळ। होरलीस केळे कैंचें लागे. (१८३) बळ करी तया भ्यावें। पळो लागे तया ध्यावे. (१८४) बीज न पेरावें खडकीं । ओल नाहीं ज्याचे बुडखीं. (१८५) बहुतां छंदांचे बहु वसे जन । नये बांट्रं मन त्यांच्या संगें. (१८६) बेडकाने चिखल खावा । काय वा सागर. (१८७) बोलाचीच कढी बोलाचाचि भात। जेवनियां तृप्त कोण जाला।। कागदी लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी. (१८८) बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धिादेखतांचि चिंथी मन धांवें॥ व्यभिचाऱ्यापासीं बैसतां क्षणभरी। देखतांचि नारी मन धांवे,