पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [२९ (१६०) पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां. (१६१) पर्जन्याचे काळी वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे धि, हिन्या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका ह्मणे घन न भेटे तों. (१६२) पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप... (१६३) पावावया फळ । अंगी असावे हे बळ. - तुका ह्मणे तई । सिद्धि वाळगती पायी. ) (१६४) पुण्यपर उपकार पाप ते परपीडा। आणीक नाही जोडा दुजा यासी. (१६५) पोसी वांज गाय। तेथें कैची दुध साय || फुटकी सांगडी । तुका ह्मणे न पवे थडी. मार (१६६) पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥ पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ जपतप अनुष्ठान । पोठासाठी जाले दीन ॥ पोटें सांडियेली चवी। नीचा पुढें तें नाचवी ॥ पोट काशियाने भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे. (१६७) पिसांची पारवीं । करोनि बाजागिरी दावी. (१६८) पायींची वाहाण पायीं बरी. (१६८) फिरंगी वाखर लोखंडाचे विळे ॥ परि ते निराळे गुणमोल ॥ पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि ते महिमान वेगळाले. (१७०) फल पिके देंठी । निमित्य वारियाची भेटी. (१७.१). फिरंगीच्या योगें करी। राजा काष्ठ हाती धरी॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक.