पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ तुकाराम. तुका ह्मणे मिळे जिवाचियेसाठी नाही तरी गोष्टी बोलों नये. (१४५) नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें. (१४६) निदास्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट. (१४७) नाही मागे येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग. (१४८) नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद. (१४९) नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडे आम्रो दावी. (१५०) नाही घांगावे लागत । एका सिते कळे भात. (१५१) नाहीं लोपों येत गुण। वेधी आणि चंदन. (१५२) निंबाचिया झाडा साकरे, आळं। आपली ती फळे न संडीच॥ तैसें अधमाचे अमंगळ चित्त । वमन ते हित करुनी सांडी ॥ परिसाचे अंगी लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥ तुका ह्मणे वेळू चंदनासंगतीं । काय ते नसती जवळीकें. (१५३) नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरी. (१५५) परिमळ म्हूण चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडतें। मोतियाचे पाणी चावू नये स्वाद। यंत्र भेदुनि नाद पाहूं नये. (१५६) पवित्र सोंवळीं। एक तीच भूमंडळीं ॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव. (१५७) प्रत्यक्षासि काय द्यावे हे प्रमाण । (१५८) पोय, होटा आणवी। मला (१५९) पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो.