पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [२७ (१३५) धांवे जातीपाशी जाती। खुण येर येरां चित्ती. (१३६) धीर तो कारण । साह्य होतो नारायण. N ATO (१३७) धनासींच धन । करी आपण जतन. (१३८) धनवंता लागीं। सर्व मान्यता आहे जगीं ॥ मातापिता बंधुजन । सर्व मानिती वचन ॥ जन मोठा चाले धंदा । तंव बहीण ह्मणे दादा ।। सदा शृंगार भूषणें । कांता लवे बहुमाने॥ ore तुका ह्मणे धन । भाग्य अशाश्वत जाण. MCN (१३९) धोंड्यासवें आदळितां फुटे डोकें। तो तो त्याच्या दुःखें घामेजेना. (१४०) नये नेत्रां जळ । नाहीं अंतरी कळकळ, (१४१) नलगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी॥ अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी। धरितांही परी आवरेना ।। सूर्य नाहीं जागे करीत या जनाप्रकाश किरणा कर म्हून. तुका ह्मणे मेघ नाचवी मयूरें। लपवितां खरें येत नाही. (१४२) नसे तरी मनी नसो । परी वाचे तरी वसो. (१४३) नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ।। तैसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंत काळ ।। वांझे न होती लेकरें। काय करावें भ्रतारें.. (१४४) नाही संतपण मिळतें हैं हाटीं । हिंडतां कपार्टी रानी वनीं ।। न ये मोल देतां धनाचिया राशी।नाही ते आकाशी पाताळीते।।