पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६] महाराष्ट्रकाव्यमकरंद [तुकाराम. (१२२) दगडाची नाव आधीच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ? (१२३) देव सखा जरी। जग अवचे रुपा करी ॥ जया देवाची जतन । तया बाधूं न शके अन (१२४) देवाच्या संबंधे विश्वचि सोयरें। सूत्र ओढे दोरे एका एक. (१२५) दर्पणासी नरें लाजे। शुद्ध खिजे देखोनि ॥ अंधळ्यास काय हिरा । गारांचे तो सारिखा. (१२६) दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति. (१२७) देव राखे तया मारील कोण । न मोडे काय हिंडत वन ॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तेही अमृत पाही. (१२८) दर्पणीचे दिले धन। दिसे पण चरफड, (१२९) दुष्टाचे चित्त न भिने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला ॥ पालथे घागरी घातले जीवन । न धरीच जाण तेही त्याला ॥ पाषाण जीवनी असतां कल्पवरी । पाहातां अंतरी कोरडा तो. (१३०) दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्य लाभ पुण्य त्याचें. (१३१) दुर्वळाचे कोण । ऐके घालूनियां मन. (१३२) दुर्बळाचे हाती सांपडलें धन। करितां जतन नये त्यासी. (१३३) दह्यांचिया अंगी निघे ताक लोणी। एका मोले दोन्ही मागों नये।। आकाशाचे पोर्टी चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये. पृथिवीच्या पोटौँ हिरा गारगोटी । दोहीसी संसाठी करूं नये. (१३४) दुबळे सदैवा । ह्मणे नागवेल केव्हां ॥ आपणासारिखें तया पाहे । स्वभावासी करिल काय ॥ मूढसभे आंत । इच्छी पंडिताचा घात ।। गा देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा.