पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [२३ (८४)जन देव तरी पायांचि पडावें । त्याचिया स्वभावे चाड नाहीं।। अग्रीचे सौजन्य शीत निवारण । पालवी बांधोनि नेतां नये॥ तुका ह्मणे विचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये, (८५) जीव तोचि देव भोजन ते भक्तिामरण तेचि मुक्ति पाषंड्यांची (८६) जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टवीती उपकारें। भूतांची दया हे भांडवल संतां। आपुली ममता नाहीं देहीं ।। तुका ह्मणे मुख परावीया सुखें ॥ अमृत हे मुखें स्त्रवतसे. (८७) जेथे पाहें तेथे देखीचा पर्वत । पायाविण मित तांतडीची. (८८) जाऊनियां तीर्था काय तुवां केलें। चर्म प्रक्षाळिलें वरी वरी॥ अंतरीचे शुद्ध कासयाने झालें । भूषण त्वां केलें आपणया । वृंदावन फळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडेचिना ॥ तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया। तोवरी कासया कुंदा तुम्ही, (८९) जिचे पोडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥ ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव. (९०) ज्याचिया बैसावे भोजन पंगती । त्याचिया संगती तैसें खावें. (९१) जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं. (९२)जन हे सुखाचें दिल्या घेतल्याचें। अंत हे काळींचें नाहीं कोणी. (९३) जो मुळव्याधी पीडिलाात्यासी देखोन हांसे खरजुला॥ आरथ करी सोसी। त्यासी हांसे तो आळसी॥ क्षयरोगी ह्मणे परता। सर रोगिया तूं आतां ॥ वडस दोही डोळां वाढले । आणिकां काने कोंचें ह्मणे.