पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [तुकाराम. (७४) चोरटें सुनें मारले टाळे। केंउं करी परि न संडी चाळे. (७५) चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती। व्याघ्र हे न खाती सर्प तया॥ विष ते अमृत आघात ते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी। दुःख तें देईल सर्व सुख फल । होतील शीतळ अग्निज्वाळा. (७६) चित्रींचे लेपशृंगारिलें निके। जीवेंविण फिकें रूप त्याचें. (७७) चंदनाच्या वासे वसतां चंदन । होती काष्ट आन वृक्षयाती. (७८) चोरा रुचे निशी। देखोनियां विटे शशी. (७९) चोरासी चांदणे वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळी जाण पाक नव्हे. (८०) जेणें मुखें स्तवी । तेंचि निंदे पार्टी लावी ॥ ऐसी अधमाची याती। लोपी सोने खाय माती।। विंचु लाभाविण । तुका ह्मणे वाहे शीण. (८१) जे का रंजले गांजले । त्यांसि ह्मणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा. मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त. (८२) जाळू नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा. (८३) जेवीं नवज्वरें तापले शरीर । लागे तया क्षीर विषतुल्य ।। तेवीं परमार्थ जीही दुरावला । तया लागी झाला सन्निपात ॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी देखी तो चंद्रासी पीतवर्ण।। तुका ह्मणे मद्यपानाची आवडी। न रुचे त्या गोडी नवनीताची.