पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [२१ (६४) गाढवाचे अंगी चंदनाची उटी । राखेसवें भेटी केली तेणें ॥ सहज गुण जयाचे देहीं। पालट कांहीं नव्हे तया ॥ माकडाचे गळां मोलाचा मणि। घातला चावुनी यकी धुंकोनि. (६५) गोड नावे क्षीर । परी साकरेचा धीर. (६६) गोमट्या बीजाची फळेही गोमटीं । बाहे तेंचि पोर्टी समतूक. (६७) गाढव शृंगारिलें को.। कांही केल्या नव्हे घोडें ॥ त्याचे भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ श्वान शिबिके बसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥ तुका ह्मणे स्वभाव कम। कांही केल्या न सुटे धर्म. ) (६८) गाढव गंगेसी न्हाणीलें । जाउनि उकरड्यावरिलोळे. प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्टेवरी लोळे ॥ (६९) चित्त समाधानें । तरी विष वाटे सोने ॥ मनाच्या तळमळे । चंदनेही अंग पोळे. (७०) चित्तीं नाहीं तें जवळी असोनि काय। वत्स सांडी माय तेणे न्यायें॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां. (७१) चौघांमध्ये बरे दिसेसें । तेथें नेमक व्हावें. (७२) चंदनाचे हात पायही चंदन ॥ परिसा नाही हीन कोणी अंग॥ का दीपा नाही पाठीं पोटीं अंधकार । सौगे साकर अवधी गोड। तुका ह्मणे तैसा सज्जनापासून । पाहतां अवगुण मिळेचिना. (७३) चंदनाचा शूळ सोनियाची बेडी। सुख नेदी फोडी प्राणनाशी.