पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [तुकाराम (५१) कल्पतरु रुया नव्हती बाभुळा। पुरविती फळा इच्छितिया ।। उदंड त्या गाई हँसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेन. (५२) कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें घोंडा पडतसे. (५३) कोरड्या गोष्टी चटक्या बोल । शिकल्या सांगे नाही ओल.) (५४) कृपेचा ओलावा । दिसे वेगळाचि. 9(५५) काय ढोरापुढे घालूनि मिष्टान्न । खरा विलपन चंदनाचें ॥ काय सेज बाज माकडा विलास । अलंकारा नास करुनी टाकी तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्प विष थीत अमृताचें. (५६) खादले पचे तरिच ते हित । ओकलिया थीत पिंड पीडी.) (५७) खरे बोले तरी । फुकासाठी जोडे हरी. (५८) खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलेंचि नीट उसंतावें. (५९) खोल ओले पड़े ते पीक उत्तम । उथळाचा श्रम वायां जाय. (६०) खद्योते फुलविलें रविपुढे ढुंग । साक्षी तंव जग उभयतां. (६१.) गेली वीरसरी। मग त्यासी रांड मारी ॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ भंगलिया चित्ता । नये काशाने सांदितां. (६२) गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषपोशी ।। कारण ते असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण? (६३) गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥ उपजतां बरे दिसे । रूप वाढतां तें नासे. ..