पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (४०) ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।अभ्यासासी सांग कार्यसिद्धि॥ नव्हे ऐसें कांही नाही अवघड । नाहीं कईवाड तोंचवरी ।। दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासे सेवनी विष पडे ॥ तुका ह्मणे कैंचा बसण्यासि ठाव।जठरी बाळा वाव एकाएकी. (४१) कानडीने केला मन्हाटा अतार । एकाचे उत्तर एका नये ॥ तिने पाचारिलें इल बा ह्मणोन।येरु पळे आण जाहली आतां ॥ तुका ह्मणे येर येरा में विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोर्टी. (४२) करुनी खातां पाक जिरे सुरणराई। करितां अतित्याई दुःख पावे. (४३) काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा. (४४) कन्या सासुन्यासि जाये । मागे परतोनी पाहे. ) (४५) काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ LINER) आहे नाही हे न कळे । हाती काय कोण्या वेळे ॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालोनियां मिठी. (४६) कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे. (४७) करितां नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ। खापरी परीस काय करी।। काय करिल तया साखरेचे आळे । बीज तैसी फळे येती तया. (४८) काय दरा करील वन । समाधान नाही जंव ॥ काय भस्म करील राख । अंतर पाक नाहीं तो. (४९) कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी।आपुलें भिकारी अर्थ नेणे. (५०) कासया एकांत सेवू तया वना। आनंद तो जनामाजी असे.