पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [तुकाराम (३१) उगेचि फुगवू नका गाल । पूर्ण सांठवावा माल. (३२) उंच वाढला एरंड । तरि का होइल इक्षुदंड. जरी गर्दभ वेगी धांवे । तरि का अश्वमोल पावे. (३३) ऐसा हा लौकिक कदा राखवेना। पतित पावना देवराया ॥ संसार करितां ह्मणती हा दोषी। यकितां आळसी पोटपोसा॥ आचार करितां ह्मणती हा पसारा। न करितां नरा निंदिताती।। संतसंगकरितां ह्मणती हा उपदेशीयेराअभाग्यासि ज्ञान नाहीं।। धन नाही त्यासि ठायींचा करंटा। समर्थासी ताठा लावीताती॥ बहु बोलो जाता ह्मणति हा वाचाळ। न बोलतां सकल ह्मणती गर्वी ॥ भेटिसि न जातां ह्मणती हा निष्ठूर। येतांजातां घर बुडविलें ॥ लग्न करूं जातां ह्मणतीहा मातला।न करितां जाहला नपुंसक।। निपुत्रिका ह्मणती पहा हो चांडाळ।पातकाचें मूळ पोरवडा ॥ लोक जैसा ओक धरितां धरवेना । अभक्ता जिरेना संतसंग. (३४) एका बीजा केला नास । मग भोगले कणीस. (३५) एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥ पाप नलगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें. (३६) एका शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड. (३७) एका हाते टाळी । कोठे वाजते निराळी. का (३८) एक ह्मणे भलें । आणिका सहजचि निदिले. (३९) एक ब्रह्मचारी गाढवा झोंबतां । हाणोनियां लाता पळाले तें।] गाढवही गेलें ब्रह्मचर्य गेलें । तोंड काळे झाले जगामाजी..