पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [१७ (२१) आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय..) (२२) आणितां त्या गती। हंस काउळे न होती. (२३) आपणा सारिखे करिती तात्काळ। कांही काळवेळ नलगे त्यांशी. (२४) आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्यां भटां जाली धणी. (२५) आधी होता वाघ्या । दैवयोगें झाला पाग्या ।। त्याचे यळकोट राहिना । देहस्वभाव जाईना. . आधी होता ग्रामजोसी। राज्यपद आले त्यासी ॥ त्याचें पंचांग राहीना। देहस्वभाव जाईना. आधी होती दासी। पट्टराणी केलें तिसी ॥ तिचें हिंडणे राहीना। देहस्वभाव जाईना. ( २५ अ) उपदेश तो भलत्या हाती । जाला चित्तीं धरावा ।। नये जाऊं पात्रावरी। कवटी सारी नारळे ॥ तुका ह्मणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे. (२६) उधळितां माती रविकळा मळे । हें कैसे न कळे भाग्यहीना ।। तुका ह्मणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि. (२७) उसने फेडितां धर्म तो कवण । काय तया जन मानवेल. (२८) उपजल्या पिंडा मरण सांगातें। मरतें उपजते सवेंचि तें.. (२९) उदक अग्निधान्य जाहल्या घडे पाक। एकाविण एक कामा नये. (३०) उंबरांतील कीटका । हेचि ब्रह्मांड ऐसें लेखा.