पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [तुकाराम. (९) अंधारे दीपका आणियेली शोभा।माणिकासी प्रभा कोंदणाची।। धन्वंतरी रोगे आणिला उजेडा। सुखी काय चाडा जाणावें तें॥ अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळे तरी सोने उंच नीच. (१०) अंतरींचा रंग उमटे बाहेरी।वोळखि यापरी आउँआप.. (११) अर्थविण पाठांतर कासया करावें । व्यर्थचि मरावें घोकूनियां. (१२) आणिकांच्या घातें। ज्यांची निवतील चित्तें ॥ तेचि ओळखावे पापी. (१३) आंधळ्यासि जन अवघेचि आंधळेोआपणासि डोळे दृष्टी नाहीं।। रोग्यां विषतुल्या लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं।। तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण। तया त्रिभुवन अवघे खोट. (१४) आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतियाच्या चित्ता.. (१५) आमिषाचे आसे गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे. (१६) आधींच आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥ मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी. (१७) आधारावांचुनि । काय सांगसी काहाणी. (१८) आशा हे समूळ खाणोनि काढावी। तेव्हांची गोसावी व्हावे तण।। नाहीतरी सुखे असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ।। जो आशा मारूनियां जयवंत व्हावें । तेव्हांचि निघावें सवीतूनि. (१९) आलें देवाचिया मना। तेथे कोणाचे चालेना. (२०) आपल्याचा कळवळा । आणिका बाळावरी नये.