पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. तुकाराम (१) अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयांविण ॥ साचिया परी । विषे भरला कल्हारी. (२) अंगी ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे. (३) अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक। तरी का हे पाक घरोघरीं ॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरी का साठवण घराघरा ॥ मामला देखोनियां छाया सुख न पविजे। जंव न बैसिजे तया तळीं. (४) अन्यत्रींचें तीर्थी नासे । तीर्थी वसे वज्रलेप. (५) अंधळ्यातें नये देखण्याची चाली। चालों ऐसी बोली तुका बोले. (६) अति जालें उत्तम वेश्येचे लावण्यापरि ते सुवासीण न ह्मणावी। उचित अनुचित केले या गव । गुणां मोल वाव थोरपणा ॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाही आविर्भाव आणिलिया. १७.) अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनियां. (८) अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तेंचि द्यावें। मुंगीवरी भार गजाचे पाळण । घालितां ते कोण कार्यसिद्धि ?