पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथ.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, एकनाथ. स्वात्मसुख. (१) पहा पां चंद्रकिरणीचे अमृत। तेणें चकोर होती तृप्त ।।) परी वायस काय तेथ। श्रद्धा धरिती॥ वानर सर्व फळे खाय । परि नारळ अव्हेरूनि जाय । तयाचे अभ्यंतरीचे काय । ठाउके तया? (२) इळा परिसेंसी झगटी । तो सोनेंचि होउनि उठी। मग इळेपण पहातां दृष्टी । काय लोखंड होईल? (३) काळ सुरनरां क्षयो करी । काळ हरिहरांस मारी। काळ सृष्टी संहारी । मारकपणे ॥ काळ अमरांस गिळी । काळ अंतकातें छळी। काळ प्रळय रुद्राची होळी । सकळ करी॥ काळ ब्रह्मांडातें खाये । तेथें रुद्र विधाता कोठे राहे । ब्रह्मांडावर्ती में होय ।ते काळाचे खाजें. (४) जैसी चोराची माय । प्रकट रडो न ल्हाय । परि आंतुच्या आंत होय । उकसा बुकसी ॥ का स्वैरिणी गर्भाच्याठी । बाहेरी उमसों नेदी गोष्टी । परि संभवले आहे पोटीं । हे तेचि जाणे. (५) जळगार जळी विरोनि जाय । परि मोती न विरे. (६) लोहाची बेडी तोडी । आवडी सोनियाची जोडी। तरी बद्धता रोकडी । जैसी तैसी ॥ खराचा शूल मारी । काय चंदनाचा तारी?