पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [मुकुंदराज, मुकुंदराज. विवेकसिंधु. (१) जरी रुईचे झाडीं। भरती मदाचिया कावडी। तरी हिंडावयाची आवडी । कां पडों द्यावी. (२) नद्या उगी स्थिरावती । तरी तेचि समुद्र होती। आधार कां नव्हती। आणिका नदीसी. (३) पाथरवटाची यकी । झालीचि पां अति तिखट निकी। तथापि करूं नये मौक्तिकीं । रंध्रशलाका. (४) स्वमींची लटकी व्यवस्था। परी निद्रिस्थासी साच होय. (५) निज शस्त्रे मरण । अमितासि गा. (६) रोगियासी अपथ्याची चाड। वरी वैद्य करी भीड । तेथे रोगनिवृत्तीचे कोड । काय करूं येईल ? (७) आधीच अनुचित मति । तें चि गुरु उपदेशिती. (८) ऊंस दिसतो वांकुडे । परी अंतरी रसाळ. (९) याचि देही याचि डोळां । जरि न पविजे मुक्तिचा सोहळा । तरी वैराग्याच्या तातवेळा । कासया शिणावें. CM