पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रघुनाथपंडित, महाराष्ट्रकाव्यमकरंद, र कचेश्वर रघुनाथ पंडित. (१) कठिण समय येतां कोण कामासि येतो. (२) मोलें उणे व्यजनही धरितां पुढारी छायां करी तपनदीप्तिसही निवारी. (३) जे कार्य तें धरिल की गुण कारणाचें. (४) गांढ्याळ जो हृदय साई न होय ज्याचें; नामेंचि देवनल, कार्य नसे तयाचें. धत्तूरहि कनकनाम सदां धरोतो, होईल काय रसिका कनकापरी तो? कचेश्वर. (१) ऋषीवाक्य हे सत्य साचार मानी. (२) कर्माची गति नाटळे विधिहरालक्ष्मीपतीलागुनी. (३) सत्संग होतां तरती दुरात्मे; सत्संग होतां परब्रह्म आमें; सत्संग होतां बहु सौख्य आहे; सत्संग नक्रा फळलाचि आहे. (४) काळ हे तिन्ही नांदती घरी.* (५) दिल्यावांचुनी पाविजे सांग कैसे ?

  • हे सुदाम्याच्या घराचे वर्णन आहे.