पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११०] महाराष्ट्रकाव्यमकरंद. अनंत,अनंतफंदी, रामजोशी. अनंत कवि. (१) मूर्खासि बोध करितां श्रम होय वाणी. (२) अभाग्यासि चितामणी लाधलासे. (३) भालपट्ट विधिलेखन नाऽन्यथा. (४)धेनूसमान तरि वाघ कसा ह्मणावा; बाळासमान उरग न कधी गणावा. जै मानिले परम सज्जन दुर्जनासी ते काय तो त्यजिल हो जिविंच्या गुणासी ? अनंतफंदी. (१) बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडूं नको. (२) वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलुं नको. (३) बरी खुशामत शहाण्याचीही मूर्खाची ती मैत्रि नको. (४) सत्कर्मा ओसरूं नको. (५) सुविचारा कातरूं नको. (६) परोपकारा शरिर झिजावें जैसा मैलागिरि-चंदन. रामजोशी. (१) परिणाम आपुला होइल हा कैसा, हे ज्यासि कळेना तो नर पशु जैसा. (२) भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. (३) किति उगाळशिल कोळसा.