पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०९ निजानंद, महाराष्ट्रकाव्यमकरंद, आनंदतनय. (३) अन्न ह्मणतां कोण धाले । शब्दें ब्रह्म कोण झाले! शिकविले बोल बोले । शुक पक्षी पैं जैसा. (१) नेदी चित्ता शांति ऐसी विद्या काशाला ? (२) मनचा खोटा फिरोनि शिणला तीर्थ काशाला? (३) एक धडना भाराभर त्या चिंध्या काशाला? (४) एक गुणी ना दुर्गुणि बेटे शंभर काशाला? (५) आदर न करी त्याच्या घरचे भोजन काशाला ? (६) अभाग्याचे समर्थाशी वैर काशाला ? (७) वाद्या अथवा भेद्या ऐसा सेवक काशाला ? आनंदतनय. (१) नाना प्रयत्न पुरुष स्वकरें करावा, _यत्ने फळेल हरिशब्द मनी धरावा. (२) भूपाल देव गुरु यांप्रति रिक्त हातें जाऊ नये. (३) राजी जया हरि तया न उणेंचि काही. (४) धीमंत जो करि सुकर्म निजस्वभावें. ... दुःख मनी न झांके, सर्वंदियां शोकसमुद्र फांके. (६) वरि वरि वचने लागति गोड । अंतरि दुर्बुद्धीचा मोड,