पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८] महाराष्ट्र काव्यमकरंद. देवीदास, अमृतराय. देवीदास (वेंकटेशस्तोत्र.) (१) उडदांमाजी काळे गोरें । काय निवडावे निवडणारें। कुचलियाची वृक्षफळे । मधुर कोठोनी असतील. ! (२) आराठीलागी मृदुता । कोोनि असेल कृपावंता। पाषाणासी गुल्मलता। कैशिया परी फुटतील ? (३) समर्थाचे घरीचे श्वान । त्यास सर्वही देती मान. (४) नीच रमली रायाशीं । तिसी कोण ह्मणेल दासी । लोह लागतां परिसासी । पूर्वस्थिती मग कैंची ? (५) गांवींचें होतें लेंडवोहळ । गंगेसी मिळतां गंगाजळ । कागविष्टेचे झाले पिंपळ । तयांसि निंद्य कोण ह्मणे ? (६) कन्या देऊनियां कुळ । मग काय विचारावें ? अमृतराय. (१) गमन नसे ज्या गांवीं । तेथील वाट कशास पुसावी. (२) बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ, (३) केलें बेंबीचे उखळ. (४) भोजनभाऊ केवळ. (५) नाती कोरकोरून काढिती । सर्व मायेचा गोंधळ. निजानंदकवि. (१) बोलणे फोल झालें । डोलणें वांयां गेलें. (२) परोपदेशी पूर्ण ज्ञानी । वाह मत्सर ममता मनीं । नागसुरें तो जैसा फणी । डोले परी विष वदनीं.