पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाध्यमकरंद. [ज्ञानदेव. (७१) काय जळार्णव पाउसें । साना होय? (७२) निद्रिताचेनि आंगेंसि । साप तैसी उर्वशी. अध्यायः १५. (७३) पाताळिंचेही निधान । दावील कीर अंजन । परि होआवे लोचन । पायाळाचे. (७४) दानशील पुरुष । वचकपणेंचि संचक. (७५) अपमानिला अतिथि । ने सुकृताची संपत्ती. (७६ ) बांधोनियां डोळे । घ्राणी लाविजती मुक्ताफळे। तरी तयांचे काय कळे । मोल मान. (७७) स्वातीचे उदक । शुक्ती मोती, व्याली विख. (७८) वन्हि काष्ट जाळूनियां । स्वयें जळे. (७९ ) सेवंतीये अरसिकांहीं । आंग पाहतां विशेष नाहीं। परी सौरभ्य नेले तिहीं । श्रमरी जाणिजे. अध्याय १६. (८०) पुजूनि देव पाहिजे । पेरूनि शेता जाईजे। तोषौनि प्रसाद घेईजे । अतिथीचा. (८१) आंगें बुडतां महापुरीं । जे वेगें काढी पैलतीरीं । ते नावचि बांधिलिया शिरीं । बुडवी ॥ कारण जें जीविता । तें वानिले जरि सेवितां । तरि अन्नचि पंडुसुता । होय विष.