पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [वामन (५५) ... विवश कर्णधराविण नाव रे. (५६) जया रोग आरोग्य त्याला प्रसिद्ध. -चरम गुरुमंजरी. (५७) धनाकारणे जे पराधीन. ... -द्वारकाविजय(५८) दयाहीनता वृत्ति हे राक्षसाची. (५९) भिन्ना नसोन दिसती जळभिन्न गारा वर्तुळ शुभ्र कठिणा मृदु थंड गारा. -विश्वासबंध. (६०) तोतों अधीक मनि आदर मीपणाचा. पाक मान आदर मापणाचा. -ब्रह्मस्तुति, (६१) ते सिद्ध होउनि कदापि न होति मानी. (६२) टाकूनियां सकस तंदुळ गर्भशाळी जे स्थूळ फोल कुटिती श्रमती त्रिकाळी. (६३) त्यांला श्रमाविण नसे फळ अन्य. .. .. (६४ ) सिद्धीविना हरिरूपा अवघ्या असिद्धा. (६५) जरी हेम तावोनियां ओप देती तयांतील त्या मिश्र धातू न जाती, कसी लावितां ते दिसे हीन सोने; तसी शुद्ध चित्तें अहो भक्तिहीनें. (६६) यकी सुवर्ण मळ बाह्य हुताशनें तें; तेही पुटीं द्रवविलें तरि शुद्ध होते. (६७) .. .. सेविल तयास फळेल सेवा. (६८) प्रारब्ध भोग न सुटे. .. (६९) जो अंध त्याचें पद लागतांही विवेकिया क्रोधचि येत नाही. (७०) .... मेरुपुढे जसि मोहरी.