पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [वामन. घाली शिरी धुळि तसें जन चित्त पापी. स्नाने करूनि जरि पावन देह झाला पापी प्रवृत्ति घडणार पुन्हा तयाला. (३०) .. .. एथ अवघे नाणे खरें तोलणें. (३१) जगिं वृथाचि न मंदहि वर्तती ____ वदति शास्त्रविशारद ये रिती. (३२) प्रयोजनावांचुनि मूर्ख तेही प्रवर्तती न त्रिजगांत देही. (३३) जळति अग्निकणेंचि तृणे जरी तरि तयां प्रबळानळ कां वरी? (३४) फुलें भक्षितो तो फळे केविं लाधे? (३५) की हस्ती धुतला तथापिहि धुळी तीरी शिरी घे... (३६) अंधा सवें फिरति अंध जसे कुवाटे. (३७) वैद्याचिया करिं दिल्ह्या बचनाग होतो -कर्मतत्व. प्राणापहार गुण टाकुनि दिव्य होतो. (३८) यत्नेंविणे फल कदापिहि सांपडेना; यत्न करूनिहि अहो फळ हे घडेना. (३९) बीजेंविणे फळ कदापि नये द्रुमाला. (४०) कर्मानुरूप सकळांसहि बुद्धि होते, ज्ञात्यासहि तदनुरूपची वर्तवीते. (४१) मिथ्या भुजंग परि ते भयकंप साचे. (४२) सूर्यास लेप न जसा रजनीतमाचा.