पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामन.] महाराष्ट्र काव्यमकरंद, [१०३ (२२) न कळतां पद अग्निवरी पडे न करि दाह असे न कधी घडे. अजितनाम वदो भलत्या मिसें, सकळ पातक भस्म करीतसे. (२३) न करूं पातक निश्चय हा घडे, मन तथापिहि पापपर्थी पडे. (२४) हस्तीतें धुतले जळी बसविलें मालिन्यही नाशिलें, तेणे ते पहिले स्वकर्म वहिले तीरींच आरंभिलें; शुंडाय धरिलें धुळीस भरिलें सर्वांगहि आपुलें. प्रायश्चित्त दिल्हें तथापि न भलें ज्याचें मन क्षोभलें. (२५) मद्याच्या कलशासि शुद्ध करितां व्यर्थेचि तीर्थे जसी. (२६) कडवट बहु वाटे शर्करा पित्तरोग्या परि परम सिता ते पित्तनाशासि योग्या. सहज मधुर तेंही पित्त नासूनि देहीं निज अति रुचि दावी आवडों दे न कांहीं. (२७) हरिकथा उदरार्थ जरी करी वगुण नाम करी भलत्यापरी. विकितसे उदरार्थ फुलें जरी शुभ सुगंध कधी न चुके तरी. (२८) न अग्नि यकी स्वगुणासि जेव्हां यकी कसे नाम गुणासि तेव्हां ? (२९) गंगेतही गज जसा धुतला तथापी