पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [वामन (८) ऐसी क्षमा तेचि मुकुंदभक्त. (९) त्यजी काम तो निस्पृही. ... (१०) असि सकळ अनर्था मूळ माझीच वाणी. -लोपामुद्रासंवाद. (११) स्तब्ध होति लिखितें जसी चित्रं. -वेणुसुधा. (१२) पहातां पहातां पहावाच वाटे, रुते चित्त जाऊनि नेत्रींच वाटे. (१३) (की) एक यत्न नव्हतां दुसरा करोती. -यज्ञपत्न्याख्यान. (१४) त्यजियले अजिहि स्वनृपासना, करिल त्याचिहि कोण उपासना? -रुक्मिणीविलास. (१५) ऐश्वर्यवंत वय आकृति ही समान स्वार्थार्थ होतिल परस्पर त्यांस मान. मैत्री विवाह न घडे अधमोत्तमातें. (१६) धनाच्या मदें मान ज्याची लवेना. (१७) दाता सुरद्रुम नमागतियास नाही. न प्रार्थिता हरि न दे स्वउपासनाही. (१८) जयां देती लाड प्रियपति तयांचाच टकळा; कळा कांति भ्रांती धरुनि अतिधीटाच सकळा.--भामाविलास. (१९) करें निर्मिला तो करें नाशिजेतो. -चित्सुधा. (२०) आकाश अंत नकळोनिहि अंतरिक्षी आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी. (२१) उडति मानसहंस जया नभी शलभ त्याचि नभी उडतां न भी. नामसुधा.