पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [९९ (३) स्वामिप्रसाद होतां रंकहि होतो सुवस्तुला योग्य. (४) दुग्धप्रदासि निर्विष होइल मुख काय कावेयाचें? श्रीरामरीति. (१) .... सुज्ञ प्रभु तुच्छ पदार्थही न अवमानी. (२) दोष कळोनिहि रुचतो प्रबळ प्राचीन कर्म ठकवीतें. विष्णुपद-वकीली. (१) प्रभुपाशी शब्दाचा दीनाच्या पालनी बरा वेंच. साधुरीति. (१) वाढवि अन्याणुगुणा साधु सदा वायु जैवि फुणगीते; सुयशाने जरि साजे लाजे परि फार आत्मगुणगीते. रुक्मिणीस्वयंवर. (१) उतरे एकहि न कसी कनकासी कोटि भांडतां धुतरे. नामार्या. (१) तोचि उदार सदन्ने जो क्षुधिता पामरा जना वाढी. (२) मातृस्तन्यावांचुनि शिशुचा कृश होय वरदुधे काय. (३) तृप्तिसुखें अनुभविती रसवेत्ते लोक साखरेत रसें; रण गति गीतिहयहरिण जाणति गुण तोकसा खरे तरसें. हरिश्चंद्र आख्यान. (१) किं निःस्पृहताचि हिता काळी विषयी नदी जसी सुतरी. १ सोचें.