पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१००] महाराष्ट्रकाव्यमकरंद [ मोरोपंत, (२)(राया) या संसारी बुध संरक्षावयासि सत्य जितो. सर्वस्व त्यजिती परि सत्य स्वमींहि साधु न त्यजिती. सत्यबहिष्कृत नर जो पितृवनसम वजनीयता पावे; पूर्वज सर्व निवावे सत्ये; अनृतें करूनि तापावे. हयमेधसप्तकासह ज्यास सविधि राजसूयही घडला, सत्यच्युत कृतिरात स्वर्गापासुनि तसा हि तो पडला. (३) सत्ये हा रवि तपतो; सत्ये भूमिप्रतिष्ठिता जाण; सत्यांत पुमर्थ सकळ; सत्यचि जीवासि पवि तनुत्राण, (४) विप्रे केली ज्याची व्हावी धनदासही खरेदी न. विधि फिरतां होती जे प्रभुचे जन दासही खरे दीन. (५) .. .. विधिपुढे उपाय नसे. (६) परि सत्यकवच असतां वक्र न होईल अग्र केंसाचें. (७) जे स्वामिवाक्यलंघन ते सकलागांत होय अत्याग. (८) सोडूनि जाय कुदशा सुदशा ये उग्र भोग तो सरतां. (९) ज्या शाणघर्षणादिक संस्कार चढे गुणासि तोचि मणी. १. स्मशान. २ नहुषराजा. ३ सर्व अपराधांत.