पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिला क्रीडा मंडळ (१९३७)

 महिला पाठशाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि मध्यमवर्गातील स्त्रिया व स्त्री शिक्षिका यांनी १९३७ मध्ये महिला क्रीडा मंडळाची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश असा होता की, स्त्रियांनी घरकामात बंदिस्त झालेल्या जीवनक्रमातून थोडा वेळ काढून करमणूक, व्यायाम आणि खेळ यात वेळ व्यतीत करावा. या संस्थेचे ध्येय स्त्रियांना देशी खेळांचे शिक्षण देणे असाही होता. या संस्थेमार्फत विविध स्पर्धा होत असत. या स्पर्धा पंचाशिवाय होत होत्या. कृष्णाबाई खिस्ते यांनी मुंबईतून शारीरिक प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी पंचांची उणीव भरून काढली व या संस्थेतील अनेक स्त्रियांना पंच होण्याचे प्रशिक्षण दिले.

 या संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत स्त्रियांना स्वतः च्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रे खुली करून दिली. संस्थेची स्थापना करण्याबरोबरच तिच्या वाढीसाठी आवश्यक सोई- सुविधा काटेकोरपणे पुरवण्याची महाराजांची पद्धत महाराणी चिमणाबाईंनीदेखील अवलंबली. स्त्रीविषयक कार्यासाठी महाराज आणि चिमणाबाई यांनी केलेली ठळक आर्थिक मदत आजच्या रुपयात ४२ कोटी ३१ लाखांहून अधिक भरते.

स्त्री-पुरुष समानतेसाठी आग्रही

 स्त्री-उन्नतीसाठीच्या विविध प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या महाराणी चिमणाबाई स्त्री-पुरुष समानतेसाठी विशेष आग्रही होत्या. सैनिकी खात्याच्या 'कवायती फौजे' संदर्भातील

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / १८