पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संगीत शाळा
 आपल्या प्रजेला सर्व क्षेत्रातील शिक्षण देण्याच्या हेतूने सयाजीरावांनी १८८६ साली उस्ताद मौलाबक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बडोद्यात म्युझिक स्कूलची स्थापना केली. फिमेल ट्रेनिंग कॉलेज, शहरातील गर्ल्स स्कूल तसेच नवसरी आणि पाटण येथील गर्ल्स स्कूलमधील मुलींसाठी स्वतंत्र म्युझिक स्कूल चालविले जात होते. सामाजिक क्षेत्रातील कार्याबाबत जागरूक व सजग नागरिक तयार करण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी दिलेल्या १६ एप्रिल १९३५ च्या आदेशानुसार बडोद्यात गर्ल्स गाईडची चळवळ सुरू केली. बडोद्याच्या फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये गर्ल्स गाईडची संकल्पना सर्वप्रथम राबवण्यात आली. १९३९-४० मध्ये बडोद्यात १,५३० गर्ल्स गाईड्स कार्यरत होत्या.
महाराणी चिमणाबाई

 स्त्रीशिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना सयाजीरावांनी महाराणी चिमणाबाईंपासून सुरुवात केली. विवाहापर्यंत निरक्षर असणाऱ्या चिमणाबाईंना शिक्षण देऊन सयाजीरावांनी त्यांच्यातील परिपूर्ण स्त्री घडवली. महाराजांच्या ' वाटेने ' मार्गक्रमण करत स्त्री-उन्नतीसाठी कार्यरत राहिलेल्या महाराणी चिमणाबाईंना ३ ऑगस्ट १८९२ ला ब्रिटिश महाराणींनी 'Emperial Order of the Crown of India' या किताबाने सन्मानित करण्यात आले. १९०६ मध्ये कलकत्ता येथील

महाराजा सयाजीराव ': स्त्रीविषयक कार्य / १५