पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९५५ वरून ९,३०३ पर्यंत वाढली. महात्मा फुलेंनी स्त्रियांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी मुलींची शाळा सुरू केली तर येथेही सयाजीरावांनी फुलेंच्या पुढे जाऊन मुलींच्या शाळेबरोबरच मुलींसाठी ग्रंथालय स्थापन करून स्त्रियांना केवळ साक्षर नव्हे तर 'ज्ञानी' बनविले.

 स्त्रियांच्या संदर्भातील अनेक महत्त्वाचे आणि पहिले ग्रंथ सयाजीरावांनी प्रकाशित केले. भानुसुखराम निर्गुणराम मेहता यांनी मीराबाईच्या जीवनचरित्राचा परिचय करून देणारे 'मीराबाई' नावाचे गुजराथी भाषेतील पुस्तक लिहिले. पुढे १९१३ मध्ये दाजी नागेश आपटे यांनी या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. विनायक सदाशिव वाकसकर, यांनी १९२५ मध्ये आपल्या 'अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे' या पुस्तकामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र लिहिले आहे. १९४० मध्ये कमलाबाई टिळक यांनी स्त्रियांच्या जीवनातील प्रश्नांवर भाष्य करणारे 'स्त्री-जीवनविषयक काही प्रश्न' हे पुस्तक लिहिले. त्याचबरोबर 'बालिका ज्ञान मालेतून' मुलींसाठीची विविध पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात आली. तर भारतीय संगीतावरील एकूण १५ ग्रंथांपैकी काही ग्रंथ विशेषतः मुलींसाठी तयार करून 'बालिका संगीत मालेतून प्रसिद्ध करण्यात आले. सयाजीरावांनी स्त्रियांसंबंधी ग्रंथ निर्मिती करून स्त्रियांना असणारे महत्त्व अधोरेखित केले.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १४