पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरोग्य आणि व्यायामविषयक ग्रंथ निर्मिती
 शाळा, महाविद्यालयांतून शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्याबरोबरच सयाजीरावांनी व्यायाम आणि आरोग्यासंदर्भातील ग्रंथ निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी प्रबोधनाचा मार्ग अवलंबला. 'श्रीसयाजीसाहित्यमालेत अनेक व्यायाम, क्रीडा आणि आहारविषयक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले. तसेच या ग्रंथमालेमध्ये इंग्रजीतील काही ग्रंथांची मराठी आणि गुजराथी या देशी भाषांमध्ये भाषांतरेदेखील प्रसिद्ध केली. यामध्ये 'Child: its Nature and Nurture' (१९२०), ‘Life's Mechanism' (१९२१), 'Health and Diseases ' (१९२९), ‘Dietetics’ (१९२९) या ग्रंथांचे गुजराथी भाषांतर तर यातील Child: its Nature & Nurture (१९३०) चे मराठी भाषांतरसुद्धा प्रकाशित केले. तसेच मल्लविद्या (१९२५), प्राचीन युद्धविद्या (१९३४), मज्जातंतुनुं बळ (१९३४), आहार विज्ञान (१९५४) इ. ग्रंथ प्रकाशित झाले.

 व्यायाम या विषयाला वाहिलेले मराठीतील पहिले मासिक १९१५ मध्ये ‘व्यायाम’ या नावाने आबासाहेब मुजुमदार यांच्या संपादनाखाली सुरू केले. हे मासिक ४३ वर्षे बडोद्यात सुरू होते. हे मासिक मराठी बरोबरच गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये निघत होते. विद्यार्थ्यांसाठी हे मासिक फारच उपयुक्त असल्याने याच्या ५०० प्रती बडोदा संस्थानातील शाळांना घेण्याचा हुकूम सयाजीरावांनी काढला होता. महाराजांकडून मिळालेला हा

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २५