पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करत उच्च-कनिष्ठ जातीतील व्यक्तींच्या विवाहांना मान्यता देण्यात आली. १९४७ मध्ये मुंबई प्रांतात समं त करण्यात आलेल्या ‘Bombay Hindu Divorce Act’ नुसार काही ठरावीक परिस्थितींमध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला.
 अस्तित्वात असणाऱ्या हिंदू कायद्यांमध्ये एकवाक्यता प्रस्थापित करण्यासाठी सक्षिप्तनियम तयार करणे आणि बदलत्या सामाजिक गरजा व मतांनुसार प्रस्थापित नियमांमध्ये बदल करणे हा मुख्य उद्देश हिंदू कोड बिलाचा मसदु ा तयार करण्यापाठीमागे होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय घटनेच्या मसदु ा निर्मितीत बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे आपण अभिमानाने सांगतो. बडोद्याच्या हिंदू कोड बिलाची प्रागतिकता विचारात घेऊन घटना समितीच्या चर्चेत डॉ. पंजाबराव देशमुख, श्रीमती जयश्री, पंडित कुंझरू, श्री. भट्ट आणि श्रीमती दुर्गाबाई या पाच घटना समिती सदस्यांनी घटना समितीतील हिंदू कोड बिलाच्या चर्चेत गौरवाने आणि आदर्श कायदे म्हणून बडोद्याच्या हिंदू कोड बिलाची दखल घेतली.
 परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांसारख्या हिंदू कोड बिलाबाबत क्रांतिकारक भूमिका घेणाऱ्या कायदेपंडिताने बडोद्याच्या हिंदू कोड बिलाबद्दल मौन का बाळगले याचेच आश्चर्य वाटते. कारण घटना समितीतील हिंदू कोड बिलाच्या चर्चेआधी १०

वर्षे १९३९ मध्ये सयाजीरावांवरील मृत्युलेखात बाबासाहेब

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / ११