पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्लड-अमेरिके पेक्षाही प्रगत कायदे के ल्याचे श्रेय सयाजीरावांना देतात. १९५० मध्ये भारतीय सवि धान अमलात आल्यानंतरदेखील हिंदू कोड बिलासाठीचा सघं र्ष सरू च राहिला. ऑक्टोबर १९५१ मध्ये प्रसिद्ध के लेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महिलांच्या विविध हक्कांची मागणी करत स्त्रीसबलीकरण चळवळीला खंबीर पाठिंबा दिला. परंतु हा पाठींबा देत असताना कम्युनिस्ट पक्षाने महिलांच्या बहुतांश मागण्यांची पूर्तता करणाऱ्या हिंदू कोड बिलाबाबत मात्र कोणतीही भूमिका घेतली नाही.
 याच निवडणुकीवेळी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून प्रभुदत्त ब्रह्मचारी या उजव्या विचारसरणीच्या सनं ्याशाने पंडित नेहरूंविरोधात आपली उमेदवारी जाहीर के ली. त्यांना तीन उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी पाठिंबा दिला. पंडित नेहरूं नी हिंदू कोड बिलाला असणारा पाठिंबा मागे घेतल्यास आपली उमेदवारी रद्द करण्याचा प्रस्ताव ब्रह्मचारींनी दिला. या प्रस्तावाला आपल्या जाहीर सभेत विरोध करताना पंडित नेहरू म्हणतात, “ही निवडणूक हरलो किंवा जिंकलो तरी मी विधिमंडळात हिंदू कोड बिल समं त करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. ही निवडणूक हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर लढवण्याची तयारी मी

के ली आहे. हे मी ब्रह्मचार्रींना लिहून देऊ शकतो.” परंतु ब्रह्मचारींना

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / १२