पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंतु तेव्हा तो समं त झाला नाही. परंतु याच्या ६ महिने आधीच फेब्रुवारी १९४६ मध्ये लंडनच्या युनिर्व्हसिटी कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात प्रा.एस. वेसी-फित्झगेराल्ड यांनी राव समितीतील व्ही.व्ही. जोशींच्या योगदानाचे कौतुक करतानाच बडोदा ससं ्थानाने हिंदू कोड बिलांमधील कायद्यांची बी.एन. राव समितीच्या स्थापनेपूर्वीच अंमलबजावणी करून आदर्श निर्माण के ल्याचे स्पष्ट के ले होते.
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४७ मध्ये भारत सरकारने पुन्हा एकदा हा हिंदू कोड बिलाचा मसदु ा घटना समितीसमोर मांडला. परंतु परंपरावादी हिंदू गटाच्या अनपेक्षित विरोधामुळे यावेळीसद्धा हा मसदुसमं त होऊ शकला नाही. याच दरम्यान हिंदू स्त्रियांची स्थिती सध ारण्याच्या उद्देशाने कें द्रीय कायदे मंडळ आणि काही ससं ्थानांनी विविध कायदे समं त के ले. १९४६ मध्ये समं त करण्यात आलेल्या ‘Hindu Marriage Disabilities Removal Act’ नुसार समान गोत्र आणि समान प्रवर असणाऱ्या व्यक्तींच्या विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात आली.
 १९४६ मध्येच समं त करण्यात आलेल्या ‘Hindu Married Women’s Right To Separate Residence and Maintenance Act’ नुसार हिंदू स्त्रियांना निवास आणि उपजीविके साठी त्यांच्या पतीच्या सपं त्तीत वाटा मागण्याचा अधिकार देण्यात आला. तर १९४९ मधील ‘Hindu Marriage

Validating Act’ नुसार विवाहामधील जातीचा अडथळा दूर

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / १०