पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्षरतेसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सयाजीरावांइतकी सत्यशोधक विचाराची भक्कम पाठराखण अन्य कोणत्याही प्रशासकाने केली नाही.
सयाजीरावांकडून फुलेंची पाठराखण
 सत्यशोधक चळवळीची भक्कम पाठराखण करणाऱ्या सयाजीरावांनी या चळवळीचे जनक महात्मा फुलेंनादेखील वेळोवेळी मदत केली. १८८४ मध्ये महाराजांनी धामणस्करांकरवी फुलेंना बडोद्याला बोलावले. फुलेंच्या या बडोदा भेटीवेळी महाराजांनी समाजसुधारणा या विषयावरील त्यांची २-३ व्याख्याने आयोजित केली. महात्मा फुलेंचे विचार कृतीत उतरवतानाच सयाजीरावांनी आर्थिक संकटाच्या काळात त्यांना मदतही केली. पक्षाघाताच्या पहिल्या आजारपणात उपचारासाठी सयाजीरावांनी फुलेंना आर्थिक मदत केली. आपल्या बडोदा भेटीत जोतीबांनी महाराजांना आपला 'शेतकऱ्याचा असूड' हा ग्रंथ वाचून दाखवला. महाराजांनी या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मदत केल्याचा उल्लेख या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर आढळतो.

 जोतीबा फुले यांचा उल्लेख महाराज नेहमी महात्मा असा करत. महाराजांनी मुंबईमधील सत्यशोधक कार्यकर्त्यांना जोतीरावांना महात्मा पदवी देण्याची सूचना केली. त्यानुसार सत्यशोधक कार्यकर्त्यांनी १८८८ मध्ये मुंबई येथे फुलेंना 'महात्मा' ही पदवी अर्पण केली. तर सयाजीरावांबद्दल आपल्याला वाटणारा आदर

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / १२