पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नोकरीतून बोलावून बडोद्यात नायब सुभे या पदावर नियुक्त केले. ही नियुक्ती मुंबईच्या मामा परमानंदांच्या शिफारशीवरून झाली होती. धामणस्कर पुढे १९०१ मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण झाले. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचे 'क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व' हे पुस्तक सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले. १९०० मध्ये कोल्हापुरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणात बिर्जेलिखित हा ग्रंथ पुरावा म्हणून वापरण्याबाबतची चर्चा कोल्हापूर दरबारात झाली होती.

 ऑक्टोबर १८८५ मध्ये रामजी संतुजी आवटे यांनी 'बडोदा वत्सल' हे सत्यशोधकी साप्ताहिक बडोद्यात सुरू केले. १८९६ च्या दरम्यान आवटे आणि धामणस्करांनी मिळून बडोद्यात माधवराव पवार यांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरू केला. १७ फेब्रुवारी १९३० रोजी महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सत्यशोधक समाजाच्या काही कार्यकर्त्यांची व्याख्याने लोकांसाठी मुद्दाम ठेवली होती. त्यावेळी महाराज स्वत: हजर होते. यामध्ये एक सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांना मदत म्हणून २०० रु. रोख दिले. नामांकित कंत्राटदार असणाऱ्या स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू या प्रमुख सत्यशोधक नेत्याला आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामास हातभार लावण्याची संधी दिली होती. बहुजन

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / ११