पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलेंनी एक अखंड लिहून व्यक्त केला. हा अखंड त्यावेळी दीनबंधू वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता. सयाजीराव आणि महात्मा फुले या दोन महापुरुषांमधील आदरयुक्त नात्याचा हा पैलू दुर्दैवाने आजवर दुर्लक्षित राहिला.
फुले आणि सयाजीराव : स्त्रीउन्नतीचे सहप्रवासी
 महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन स्वत:पासून समाज परिवर्तनास सुरुवात केली. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवियित्री आणि समाजसेविका या विविध भूमिकांतून सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी कार्य केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी खर्ची घातले. त्यामुळेच त्यांना महिलांचा मुक्तिदाता असेही म्हटले जाते. फुलेंप्रमाणेच सयाजीरावांनी विवाहापर्यंत निरक्षर असणाऱ्या महाराणी चिमणाबाईंना शिक्षण देऊन स्त्री विकासाच्या कार्यात सहभागी करून घेतले. मुलींच्या शिक्षणासाठी चिमणाबाईंनी स्वतः च्या खानगी खर्चातून महिन्याला २०० रु. ची तरतूद केली होती. त्याचप्रमाणे बॉम्बे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यासाठी महाराणी चिमणाबाईंनी स्वतंत्रपणे १,००,००० रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती.

 स्त्री-उन्नतीसाठी कार्यरत राहिलेल्या महाराणी चिमणाबाईंना ३ ऑगस्ट १८९२ ला ब्रिटिश महाराणींनी 'Emperial Order of the Crown of India' या किताबाने सन्मानित करण्यात

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / १३