पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहकार चळवळीच्या मूलतत्त्वांची मातृभाषेत माहिती व्हावी यासाठी सयाजीरावांनी जगभरातल्या सहकारावरील महत्त्वपूर्ण ग्रंथांचे गुजराथी भाषेत भाषांतर करून घेतले. १९२४ मध्ये 'सहकार अने राष्ट्रीय जीवन', १९३० मध्ये 'ग्रामजीवनमा सहकार्य' तर १९३२ मध्ये सहकारमीमांसा, अर्थशास्त्र या पुस्तकांचा यामध्ये समावेश होता. सयाजीरावांनी सहकार खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आणि सहकार चळवळीची आवड असणाऱ्या लोकांसाठी सहकार परिषदा व प्रशिक्षणवर्गांचे आयोजनदेखील केले होते.

 १९१४ साली बडोदा शहरात पहिल्या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. १९९५-१६ मध्ये दोन जिल्हास्तरीय तर ४ तालुकास्तरीय सहकार परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. यातील २ जिल्हास्तरीय परिषदा बडोदा जिल्ह्यासाठी पाद्रा व कडी जिल्ह्यासाठी मेहसाना येथे आयोजित करण्यात आल्या. या परिषदांच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व्यक्तींची नेमणूक करण्यात आली होती. पाद्रा येथील परिषदेचे अध्यक्ष नायब दिवाण श्रीमंत गणपतराव गायकवाड हे होते, तर मेहसाना येथील परिषदेचे अध्यक्षपद श्रीमंत संपतराव गायकवाड (सुभा) यांनी भूषवले. मियागम, संधाली, अमरेली आणि कोडीनार या ठिकाणी तालुकास्तरीय परिषदा आयोजित केल्या होत्या. १९१५-१६ पासून कृषी त्रैमासिकाच्या संपादनाचे काम कृषी खात्याकडून काढून सहकार खात्याकडे देण्यात

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३१