पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली. १९३८-३९ मध्ये ५५ महिला काटकसर संस्था अस्तित्वात होत्या. सयाजीरावांनी महिलांबरोबरच पुरुष काटकसर संस्थांची निर्मिती करून भारताला स्त्री-पुरुष समानतेचा अनोखा आदर्श घालून दिला.

१२) सहकारी चारा पुरवठा संस्था

 सयाजीरावांना आपल्या जनतेबरोबरच संस्थानातील जनावरांची विशेष काळजी होती. दुष्काळी काळात किंवा पूर संकटात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या चारा संकटाला तोंड द्यावे लागू नये यासाठी सयाजीरावांनी १९२३-२४ मध्ये ३६ पशुखाद्य साठवणूक सहकारी संस्थांची निर्मिती केली. या संस्थांचे वेगळेपण म्हणजे यामध्ये वाळलेल्या चाऱ्याबरोबरच ओल्या चाऱ्याचीदेखील साठवणूक करण्याची व्यवस्था केली होती. या संस्थेबरोबरच संकट काळात जनतेला धान्याची कमतरता पडू नये यासाठी ११ सहकारी धान्य साठवणूक संस्थांची निर्मिती केली.

बडोद्यातील सहकार साक्षरता

 सयाजीराव महाराजांच्या समाजविकास योजनांमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व होते. सहकार चळवळही याला अपवाद नव्हती. सहकार चळवळीची रुजवणूक लोकांमध्ये व्हावी म्हणून १९९४ पासून बडोद्यात सहकार साक्षरतेची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. लोकांना

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३०