पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चळवळीच्या कामाची दखल घेऊन २००६ मध्ये ज्यांना नोबेल पुरस्कार दिला गेला त्या महंमद युनूस यांच्या अगोदर ५० वर्षे सयाजीरावांनी बडोद्यात हा यशस्वी प्रयोग केला होता. १९३८- ३९ मध्ये ५५ महिला काटकसर संस्था अस्तित्वात होत्या.

 १९३२-३३ दरम्यान बडोद्यात एकूण २८ काटकसर संस्था अस्तित्वात होत्या. यामध्ये १३ महिला काटकसर संस्था तर २ पुरुष काटकसर संस्था होत्या. बडोद्यातील २८ काटकसर संस्थांची एकत्रित सभासद संख्या २४१ इतकी होती. त्यापैकी फक्त १५ काटकसर संस्थाच पूर्ण कार्यक्षमतेने आपले काम करत होत्या. महिला काटकसर संस्थांच्या २६५ सभासदांनी या आर्थिक वर्षात एकूण ३,५३८ रुपयांची काटकसर केली.

 राणीपरज आदिवासी क्षेत्रातील महिलांना काटकसरीची सवय लागून या माध्यमातून आदिवासी महिलांना उन्नती साधता यावी यासाठी राणीपरज आदिवासी क्षेत्रात १९३६-३७ या वर्षाच्या सुरुवातीस २४ महिला काटकसर संस्था कार्यरत होत्या. १९३८- ३९ मध्ये या भागातील बंद पडलेल्या संस्थांच्या जागी तितक्याच नवीन संस्थांची नोंदणी करण्यात आली. आदिवासी क्षेत्रातील आर्थिक नियोजनाकडे सयाजीरावांचे बारकाईने असणारे लक्ष यातून व्यक्त होते. आदिवासी क्षेत्रात कार्यरत महिला आणि पुरुष काटकसर संस्थांची एकत्रित सभासद संख्या ७३१ इतकी होती. या संस्थांकडे एकूण ११,९२६ रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध होते. तर या संस्थेच्या सभासदांनी सुमारे ११,३३९ रु.ची बचत

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २९