पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत सयाजीरावांनी पूर निवारण संस्थांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत पोचवली.

३) सहकरी समाज सुधार संस्था

 सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सयाजीरावांनी १९२९ मध्ये सहकारी तत्त्वावर समाज सुधार संस्थांची स्थापना केली. १९२९-३० मध्ये ३ समाज सुधार संस्था बडोदा संस्थानात कार्यरत होत्या. यापैकी उन्झा औडीच ब्राह्मण संस्था औडीच ब्राह्मण समाजासाठी कार्यरत होती. या संस्थेने आपल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये कपात करून सुमारे ११ लाख ५२ हजार रुपयांची काटकसर केली. या काटकसरीतून सामाजिक सुधारणेसंदर्भात समाजात जागृतीचे काम हाती घेण्यात आले. 'कडवा पाटीदार केलवानी मंडळ' या समाज सुधार संस्थेनेदेखील या जागृतीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

४) भंगी सहकारी संस्था

 सफाई कर्मचाऱ्यांना सहकार चळवळीमध्ये सामील करण्याच्या हेतूने १९३८ मध्ये सयाजीरावांनी भंगी सहकारी संस्थांची निर्मिती केली. बडोद्यातील १७ भंगी सहकारी संस्थांना सयाजीरावांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्यात आले. या संस्थांचे बहुतांश सभासद हे नगरपालिकांचे सफाई

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २१