Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धामणस्कर - केळूसकर बंध
 सयाजीरावांनी जेव्हा इंग्रजीतील राष्ट्रकथामालेचे काम हाती घेतले होते, त्यावेळी धामणस्कारांच्या शिफारशीवरूनच महाराजांनी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांना या मालेतील 'फ्रान्सचा जुना इतिहास' या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे काम दिले. त्यामुळेच केळुसकरांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या ग्रंथलेखन व्यवसायातील प्रवेशाचे श्रेय धामणस्करांना दिले आहे. फ्रान्सचा जुना इतिहास हा ग्रंथ १८९३ मध्ये प्रकाशित झाला होता. महाराजांनी पुढे केळुस्कारांना सात उपनिषदांचे भाषांतर करण्याची संधी दिली. हे काम केळूसकरांनी १८९९ ला पूर्ण केले. असे काम करणारे केळुसकर हे पहिले ब्राहमणेतर आहेत. पुढे केळुसकरांनी मराठीतील पहिली ठरलेली गौतम बुद्ध, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. याच केळुसकरांनी पुढे बाबासाहेबांना सयाजीरावांकडून शिष्यवृत्ती मिळून दिली. यामुळे धामणस्करांप्रती केळुसकरांची असणारी कृतज्ञता व्यक्त करणारे एक उदाहरण म्हणजे १९०१ मध्ये धामणस्कर बडोदा संस्थानचे दिवाण झाल्यानंतर केळुसकरांनी १९०२ मध्ये धामणस्करांचे छोटे चरित्र लिहिले.
बडोदा प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या
 १८९३ साली धामणस्करांची नायब दिवाणपदी नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दोन-तीन वर्षे काम केले. त्या हुद्द्यावर असता त्यांना फौज खात्याची तपासणी करावी लागली. पुढे

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / २१