कडी, अमरेली, बडोदा आणि नवसारीचा दौरा केला. शेतकी खात्याचे प्रमुख खासेराव जाधव, दुष्काळ निवारण अधिकारी धामणस्करांसोबत होते. बैलगाड़ी आणि घोड्यावर दौरा केला. या दुष्काळादरम्यान धामणस्करांनी दुष्काळ अधिकारी म्हणून बजावलेली भूमिका त्यांच्यातील तळमळीच्या सत्यशोधक कार्यकर्त्याची चुणूक दाखविणारी होती.
फुले - सयाजीराव भेटीचे माध्यम
१८८२ मध्ये धामणस्करांनी पुण्यात महाराजा सयाजीराव आणि महात्मा फुले यांची भेट घडवून आणली. १८८३ मध्ये धामणस्करांच्या मध्यस्थीने फुलेंनी बडोद्याला भेट दिली. बडोदावत्सलचे संपादक रामजी संतूजी आवटे आणि धामणस्कर यांनी १८९६ मध्ये बडोद्यात मराठा जातीचे पुरोहित तयार करण्यासाठी माधवराव पवार यांच्या घरी पुरोहित पाठशाला सुरू केली. पुढे २३ वर्षांनी याच धर्तीवर १९१९ मध्ये कोल्हापूर येथे श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना सत्यशोधक भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली केली. १९१० मध्ये बडोदा येथे भरलेल्या चौथ्या मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात धामणस्करांच्या पत्नी जानकीबाई यांनी धामणस्करांच्या मृत्युपत्रातील इच्छेनुसार ७५ हजार रु.ची (आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम अंदाजे १५ कोटी रुपये इतकी भरते) जंगम मालमत्ता मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान केली.
पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/२०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / २०