पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव गायकवाड


महिने राहिले होते. १८८४ मध्ये सयाजीरावांनी धामणस्करांकरवी फुलेंना बडोद्यात बोलावून समाजसुधारणेवर त्यांची २-३ व्याख्याने आयोजित केली. सयाजीराव फुलेंच्या धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारधारेवरून पुढे गेलेले पहिले राज्यकर्ते आहेत. फुलेंनी ज्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा आग्रह धरला होता त्या क्रांतीला अनुरूप आणि प्रसंगी अधिक व्यापक करण्याची ऐतिहासिक कामगिरी महाराजांनी केली होती. परंतु आजपर्यंत या अनुषंगाने संशोधन-लेखन का झाले नसावे हा प्रश्न पडतो. या लेखनाच्या निमित्ताने सत्यशोधक चळवळीतील ‘सयाजीपर्व' हा अज्ञात परंतु अतिशय रचनात्मक इतिहास उजेडात येत आहे. या नव्या प्रकाशात सत्यशोधक चळवळीचा पुनर्विचार आपल्याला मार्गदर्शक ठरेल.

 महात्मा फुलेंचा पक्षाघाताच्या पहिल्या आजारपणात उजवा हात निकामी झाल्याने त्यांनी डाव्या हाताने 'सार्वजनिक सत्यधर्म' हा ग्रंथ लिहिला. या

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ७