पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुलामगिरीतून मुक्तता सयाजीरावांनी धर्मसाक्षरतेतून परमोच्च टोकाला नेली. परंतु महाराष्ट्र या क्रांतीबाबत 'अनभिज्ञ' आहे.
 १९१५ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात हिंदू धर्मातील सर्व जातींना धार्मिक विधी करण्याचा अधिकार देणारा हिंदू पुरोहित कायदा लागू केला. हा जगातील अशा प्रकारचा पहिला आणि आजअखेचा एकमेव कायदा आहे. धार्मिक क्षेत्रातील एका विशिष्ट जातीच्या वंशपरंपरागत वर्चस्वामुळे होणारे धार्मिक आणि आर्थिक शोषण तसेच त्यातून निर्माण होणारी गुलामगिरी याविरुद्ध फुले संघर्ष करत आले. फुलेंचा हा संघर्ष आणि सयाजीरावांनी हिंदू पुरोहित कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली धार्मिक आणि सांस्कृतिक समता यांचा तुलनात्मक विचार केला तर फुलेंना अपेक्षित असणारी धार्मिक क्रांती सयाजीरावांनी यशस्वी केली असे म्हणता येईल.
 या कायद्याचा मुख्य उद्देश धार्मिक विधी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि त्यांचा खरा अर्थ यजमानांना कळून यजमानांचा पूजेमागील आध्यात्मिक हेतू साध्य व्हावा हा होता. या कायद्यानुसार हिंदू पुरोहित परीक्षा, याज्ञिक विषयातील किंवा श्रावणमास दक्षिणा परीक्षा यापैकी कोणत्याही परीक्षेत पास झाल्यास किंवा संस्थानाकडून विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या व्यक्तीस संस्थानाकडून परवाना मिळाल्यावरच पौरोहित्याचा अधिकार प्राप्त होत होता. या निकषात न बसणारा पुरोहित धार्मिक विधी करत असल्यास त्याला २५ रु. पर्यंत दंडाची तरतूद होती.
 सत्यशोधक आंबेडकरांकडून अनुकरण
 सयाजीरावांचा हिंदू पुरोहित कायदा भारतातील धर्म चर्चेच्या इतिहासात आजअखेर परिघाबाहेर कसा काय राहिला याचे आश्चर्य वाटते. कारण हा कायदा फक्त कागदावर लागू झाला होता असे नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बडोद्यात १९९५ पासून सुरु झाली होती. या कायद्यातील कलमे, या कायद्याचा उल्लेख न करता का असेना, आपल्या १९३६ च्या जगप्रसिद्ध 'Annihilation of Caste' या न झालेल्या प्रकाशित भाषणात त्यांचा स्वतःचा धर्मसुधारणेचा कार्यक्रम म्हणून देत असताना जशाच्या तसा प्रथम चांगला उपयोग बाबासाहेबांनी केला.

 या कायद्यातील कलमांचा तपशील सारांशरूपाने पुढीलप्रमाणे होता. पौरोहित्याचा हक्क प्राप्त झालेल्या पुरोहितास सहा वर्षातून एकदा पुरोहित परीक्षा

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २९