पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर


पास होणे बंधनकारक होते. नंतर ही मर्यादा ३ वर्षांवर व शेवटी दरवर्षी परीक्षा पास होऊन परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले. ही परीक्षा पास होणाऱ्या सर्व हिंदुंना मग त्यांची जात कोणतीही असो त्याला ही परीक्षा पास झाल्यावर पौरोहित्य करता येत होते. पुरोहितांनी पुजेवेळी केल्या जाणाऱ्या मंत्रपठणातील मंत्राचा अर्थं यजमानांना समजून सांगणे बंधनकारक केले. मंत्रांचा अर्थ यजमानांना समजून न सांगणाऱ्या पुरोहितांना शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती.
 फुले स्मारकाचे उद्गाते

 ७ डिसेंबर १८९० मध्ये महात्मा फुलेंचे समग्र वाड्मय प्रकाशित करण्याची पहिली मागणी बडोद्यातील 'बडोदावत्सल' या सत्यशोधकीय विचाराच्या साप्ताहिकातील मृत्युलेखात केली होती. यानंतर ७९ वर्षांनी महाराष्ट्र शासनाने १९६९ मध्ये महात्मा फुलेंचे समग्र वाड्मय प्रकाशित केले. सावित्रीबाईंचा भाषण संग्रह १८९२ मध्ये 'बडोदावत्सल' ने प्रकाशित केला. फुल्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक झाल्यास त्याला आर्थिक मदत करण्याची सयाजीरावांनी तयारी

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ३०