पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वागणूक पुढे १२ वर्षानंतर १८९९ मध्ये मूळ संस्कृत ग्रंथांवरून उपनिषदांचे निर्दोष भाषांतर करून कशी निरर्थक आहे हे केळूसकरांनी सिद्ध केले.
 कर्मवीर भाऊराव पाटील
 १९०२ पासून भास्करराव जाधव व गणपतराव वकील यांच्या 'दीनबंधू' वर्तमानपत्राच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटलांवर पडत होता. जानेवारी १९३६ मधील सयाजीरावांच्या राज्यकारभाराच्या हिरकमहोत्सवी कार्यक्रमाचे रयत शिक्षण संस्थेस आमंत्रण होते. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या वतीने भाऊराव पाटील, एम. बी. मुथा, बी. एन. नलावडे आणि बी. एस. बारटक्के यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहिले. यावेळी दरबारी रिवाजाप्रमाणे भाऊरावांच्या डोक्यावर पगडी नसल्यामुळे त्यांना मंडपाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. दरम्यान सयाजीरावांनी व्यासपीठावरून प्रवेशद्वारावरील डोक्यावर पगडी नसणाऱ्या

कर्मवीर भाऊराव पाटील
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २३