पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मामा परमानंद


दोन दिवसांनी विनायक कोंडदेव ओक, पेठे, इंदूप्रकाशचे शंकर पांडुरंग पंडित इ. मित्रमंडळी बोलत बसली असता केळूसकर तेथे गेले. तेव्हा केळूसकरांच्या इंदूप्रकाशमधील लेखाची प्रशंसा करताना शंकर पंडित म्हणाले, “मराठा असून कसे चांगले लिहितो.” पंडितांनी केळूसकरांची केलेली ही प्रशंसा विनायक ओक यांना आवडली नसावी. विनायक ओक तोऱ्यात उत्तरले, “जरी हा मराठा असला तरी ब्राह्मणांशिवाय इतरांना शुद्ध मराठी लिहिता येणार नाही. धार्मिक विषय तर त्यांना समजणेच शक्य नाही.”

 भारतीय ज्ञानव्यवस्थेत संस्कृत भाषेच्या माध्यमातून ब्राह्मणांनी ज्ञानव्यवस्था आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे दोन-अडीच हजार वर्षे ते हिंदू समाजव्यवस्थेवर सत्ता गाजवत आले. ब्रिटीश काळात त्यांच्या या दीर्घ परंपरेला हादरे बसण्यास सुरुवात झाली. या कालखंडातील पहिल्या टप्प्यातील हा अनुभव परंपरा पाहता स्वाभाविक म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे ब्राह्मणी अहंकार आणि तुच्छतावाद याचाही तो प्रातिनिधिक हुंकार म्हणून विचारात घ्यावा लागेल. आपल्याला मिळालेली ही

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २२