पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजातर्फे सयाजीरावांचा सत्कार झाल्याची आठवण सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांनी नोंदवली आहे.
 यावेळीच सत्यशोधकांकडून चालवण्यात येणाऱ्या काही शाळांना सयाजीरावांनी भेटी दिल्या. सत्यशोधक समाजाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या शाळेला सयाजीरावांनी बरीच वर्षे दरमहा १०० रुपये देणगी दिली. १८९६ च्या दरम्यान रामजी संतूजी आवटे आणि धामणस्करांनी मिळून बडोद्यातील माधवराव पवारांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरु केला. १७ फेब्रुवारी १९३० रोजी सयाजीरावांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये जनतेसाठी सत्यशोधक कार्यकर्त्यांची व्याख्याने आयोजित केली होती. या व्याख्यानांना महाराज स्वतः उपस्थित होते. यावेळी सयाजीरावांनी नारो बाबाजी महागट यांना २०० रु. ची मदत केली होती. सत्यशोधक वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचा 'क्षत्रिय व त्यांचे अस्तित्व' हा ग्रंथ सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाला.
 सत्यशोधक केळूसकर
 नारायण मेघाजी लोखंडे यांच्या 'दीनबंधू' साप्ताहिकात केळूसकरांचे लेख सातत्याने प्रकाशित होत. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाच्या सभांमध्ये केळूसकरांनी केलेल्या भाषणांचा सारांशदेखील 'दीनबंधू मध्ये प्रकाशित होत असे. नीतिप्रसारक मंडळीच्या साप्ताहिक सभेत केळूसकर विविध विषयांवर भाषणे करत. नीतिप्रसारक मंडळीत सलग १३ वर्षे भाषणे केल्यामुळे आकस्मितपणे कोणत्याही विषयावर बोलण्याची आपली तयारी झाल्याचे केळूसकरांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. 'दीनबंधू' प्रमाणेच 'सुबोधपत्रिका', 'सुबोधप्रकाश', ‘शेतकऱ्यांचा कैवारी” इत्यादी साप्ताहिकांत केळूसकरांचे विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध होत होते. त्यापैकी एक लेख 'राजकीय ऋषी' मामा परमानंद यांनी वाचला. तो लेख वामन मोडकांनी लिहिल्याचा समज झाल्यामुळे मामा परमानंदांनी केळूसकरांऐवजी मोडकांचे अभिनंदन केले.
 १८८७ मध्ये मुंबईच्या हेमंत व्याख्यानमालेत रावबहाद्दूर वामन

मोडक यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानावर केळूसकरांनी 'इंदूप्रकाश' मध्ये लेख लिहून मुद्देसूद व सडेतोड टीका केली. केळूसकरांचा हा लेख प्रसिध्द झाल्यानंतर

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २१