पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उच्च जातीय लोकांना केवळ जातीमत्सरास्तव किंवा खाजगी द्वेषभावास्तव वाईट वाटले.
 दुष्काळ निवारण अधिकारी
 १८९९ साली जून, जुलै, ऑगस्ट पावसाविना कोरडे गेले. दुष्काळाची चाहूल ओळखून सयाजीरावांनी चारही प्रांतात दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी धामणस्करांना दुष्काळ निवारण अधिकारी नेमले. दुष्काळाचे स्वरूप भीषण होते. सयाजीरावांनी स्वतः कडी, अमरेली, बडोदा आणि नवसारीचा दौरा केला. यावेळी शेतकी खात्याचे प्रमुख खासेराव जाधव दुष्काळ निवारण अधिकारी धामणस्कर महाराजांसोबत होते. या दुष्काळादरम्यान धामणस्करांनी दुष्काळ अधिकारी म्हणून बजावलेली भूमिका त्यांच्यातील तळमळीच्या सत्यशोधक कार्यकर्त्याची चुणूक दाखविणारी होती.

खासेराव जाधव
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / १८